'अरुणा'च्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट : मंगेश लोके

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 12, 2024 10:37 AM
views 110  views

 वैभववाडी : अरूणा मध्यम प्रकल्पाच्या सुरू असलेल्या उजव्या कालव्याचे संपुर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.यामुळेच पहील्याच पावसात  कालव्याच्या भिंतीला तडे गेले आहेत.त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.

अरूणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची भिंतीला चार दिवसांपुर्वी झालेल्या पावसात तडे गेले आहे.या कामाची पाहणी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली.त्यानंतर श्री. लोके यांनी प्रसिध्दीपत्रकातुन चौकशीची मागणी केली आहे.स्थानिक लोकप्रतिनिधीना हाताशी धरून या कालव्याच्या कामाचा मक्ता निश्चित करण्यात आला.सहा किलोमीटर लांबीच्या या कालव्याचे दर्जेदार झालेले नाही.त्याला अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत.त्यामुळेच भिंतीला तडे गेले आहेत.याशिवाय या कालव्यामुळे तिरवडे तर्फे खारेपाटण येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.त्यामुळे बांधण्यात आलेल्या पुर्ण कालव्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे आणि या संपुर्ण कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण कार्यकारी अभियंता गुणनियत्रंक कोल्हापुर आणि प्रधान सचिव पाटबंधारे विभाग ठाणे यांच्याकडे करणार आहोत.शेतकऱ्यांना जोपर्यत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यत कालव्याचे काम देखील आम्ही सुरू करू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.