सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती इंटरनॅशनल आर्ट कॅम्पमध्ये

Edited by:
Published on: November 28, 2024 18:02 PM
views 216  views

रत्नागिरी :  २६ वे कलावर्त कलापर्व इंटरनॅशनल आर्ट कॅम्प हा देशातील कला विद्यार्थ्यांसाठी ड्रॉइंग, पेंटिंग, ग्राफिक्स करिता कलावर्तन्यास या नावाने उज्जैन मध्यप्रदेश या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी या आर्ट कॅम्प मध्ये संपूर्ण भारतातून साधारणता निवडक शंभर कला विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

यामध्ये सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या कला महाविद्यालयातील तीन कला विद्यार्थी सहभागी झाले होते. या कॅम्प दरम्यान झालेल्या स्पर्धेत  सुजय मंगेश निवाते या विद्यार्थ्यास त्यांनी केलेल्या निसर्गचित्रणाकरिता द्वितीय पारितोषिक व रोख रक्कम प्राप्त झाली. सौरभ संतोष साठे या विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्मचित्रणाकरिता स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय मुकुंद सखाराम भांड विशेष पारितोषिक प्राप्त झाले. तसेच सिद्धार्थ भोवड या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या चित्राद्वारे एक वेगळी छाप पाडली. या स्पर्धेमधून निवड होणे त्या विद्यार्थ्यांसाठी व कलामहाविद्यालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे कलामहाविद्यालयाचे व सह्याद्री शिक्षण संस्थेचे नाव उंचावले आहे.

विद्यार्थी देखील आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास देत आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर - चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.