कलावंतांना सैनिक पतसंस्थेचं पाठबळ..!

'सांस्कृतिक कला महोत्सवा'च आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: February 06, 2024 12:19 PM
views 74  views

सावंतवाडी : सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग व सहयोगी संस्था सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 'सांस्कृतिक कला महोत्सव'आयोजित करण्यात आला आहे. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिवउद्यान, सावंतवाडी येथे या महोत्सवाच आयोजन करण्यात आलं आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केल आहे. 

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग व सहयोगी संस्था सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कला महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १६ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा.प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या मालवणी कविता गायन व नांदेड येथील प्रसिध्द गायक धनंजय जोशी यांच्या गायनाच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे.  दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला 'सवेश गीत गायन स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा येथील प्रसिद्ध गायकांचा यात सहभाग असणार आहे. शेवटच्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी 'दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग' यांचा ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोग 'वृश्चिकायन' हा ठीक ७ वा.सादर केला जाणार आहे. यामध्ये बाबा मयेकर, चारूहास मांजरेकर, शिवा जोशी, दत्तप्रसाद शेणई, मोरेश्वर सावंत, स्वप्नील नाईक, रामचंद्र रावले, दादा केळुसकर, दत्तप्रसाद तवटे, भाई म्हानकर, बाळा मुणनकर आदी कलाकार व हार्मोनियम संकेत कुडव, पखवाज निखिल निकम व झांज बाबू कोरगावकर हे साथसंगत करणार आहेत. दरम्यान, विनामुल्य कुपनद्वारे 'लकी ड्रॉ' हे यातील खास आकर्षण असणार आहे. खास आकर्षक अशी बक्षीस १६ व १७ फेब्रुवारी रोजी 'लकी ड्रॉ' माध्यमातून काढली जाणार आहेत. सावंतवाडीच्या जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान समोरील पटांगणात हा महोत्सव होणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी दिली. या सांस्कृतिक कला महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे आदी उपस्थित होते.