मुणगेच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यस्तरावर !

Edited by: संदीप देसाई
Published on: November 21, 2023 17:24 PM
views 288  views

सिंधुदुर्ग : मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा नववीतील विध्यार्थी देवांग रघुनाथ मेस्त्री याने माध्य. व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय शासकीय कला उत्सव स्पर्धेत  प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यू इंग्लिश स्कूल कसाल  येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक खेळणी या प्रकारात माडाच्या झावळ्यांच्या पानांपासून विविध कलाकृती तयार करणे, तरंग चित्र, तरंग खेळणी - मासे, फुलपाखरे, पक्षी इ. कलाकृती सादर केली होती. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याच्या  कलाकृतीची निवड झाली आहे. देवांग याला कलाशिक्षिका गौरी तवटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.