कला साधना आणि तपश्चर्यने समृद्ध होते : गणेश ठाकूर

हळबे महाविद्तयालयातील अभिनय कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद
Edited by: संदीप देसाई
Published on: July 18, 2023 15:19 PM
views 92  views

दोडामार्ग :  जन्माला येताना प्रत्येक व्यक्ती एखादी कला घेऊनच येतो. त्याच्यात कोणतीतरी उपजतकल कला असतेच म्हणून आपल्यातल्या कलेचा शोध घेऊन त्याचा विकास करा. कला साधनेने समृद्ध होते.आणि कलाकार मोठा होतो. त्यासाठी स्वतः मधल्या कलेचा  शोध घ्या.तिचा  विकास करा. त्यासाठी मेहनत घ्या. कष्ट करा. निरीक्षण क्षमता वाढवा.एकमेकांचा आदर करा. आपल्याकडचे  ज्ञान दुसऱ्याला दया, असे आवाहन गणेश ठाकूर यांनी केले. येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात नाट्य कला, चित्रकला, मातीकाम,मिमिक्री,गायन या विविध विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर चित्रपट कलाकार अरुण गावंढळकर, टी व्ही मालिकेत काम केलेले उदय पास्ते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.डी गाथाडे हे उपस्थित होते. 

 यावेळी उदय पास्ते यांनी कलाकार जडणघडणीमध्ये कलाकार,त्याचे कुटुंबीय, शाळा, महाविद्यालय आणि समाजाची भूमिका महत्त्वाची असते.असे सांगितले.

तर अरुण गावंढळकर यांनी विविध प्राणी पक्षी व कलाकारांचे आवाज काढून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. आणि श्रोत्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो असे स्पष्ट

 केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य  डॉ. सुभाष सावंत म्हणाले की कला आत्मसात करण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. डी.गाथाडे  यांनी केले

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम जाधव यांनी केले.तर उपस्थितांचे आभार गौरवी सावंत हिने मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रिया नाईक, ऋतुजा गवस, वैभवी कदम, डिंपल राजपुरोहित,शिवानी उगाडेकर  यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.