
सावर्डे : महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत येथील सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट चे ३१ वे वार्षिक कलाप्रदर्शन आणि गुणवंतांचा पारितोषिक वितरण समारंभ, बुधवार, ता. १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता, शिक्षणमहर्षि स्व. गोविंदराव निकम सभागृह, गोविंदराव निकम फार्मसी कॉलेज सावर्डे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष आणि प्रमुख म्हणून चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे तथा परिक्षक म्हणून कोल्हापूर चे चित्रकार बबन माने आणि संतोष पोवार. तसेच चिपळूण तालुक्यातील सुपुत्र आणि शिरगांव येथील प्रसिद्ध शिल्पकार संदिप ताम्हणकर उपस्थित राहणार आहेत. सोबत सह्याद्रि शिक्षक संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट चे चेअरमन प्रा.प्रकाश राजेशिर्केही उपस्थित राहणार आहेत. सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट कडून दिला जाणारा वार्षिक शिक्षणमहर्षि स्व.गोविंदराव निकम " कला जीवन गौरव पुरस्कार ", कोकणच्या रायगड जिल्ह्यातील कलाशिक्षक सलीम अल्लाबक्ष मणेरी यांना जाहीर करण्यात आला असून, या कार्यक्रमात तो त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल. तसेच परिक्षक चित्रकार आणि शिल्पकार यांचे दुपार च्या सत्रात प्रात्यक्षिक होणार आहे.
तसेच या प्रदर्शनात सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे च्या.विद्यार्थ्यांची सुमारे ४५० चित्र आणि शिल्पे मांडण्यात येणार आहेत. हे चित्र-शिल्प प्रदर्शन १५ जानेवारी पासून पुढे आठवडाभर विनामूल्य सुरु राहणार आहे. अशी माहिती सह्याद्रि आर्ट कॉलेजचे प्राचार्य माणिक यादव यांनी सांगितले.