मेल्यानंतर 5 लाख होये खेका ? ; संतप्त वृद्धांचा महावितरणला सवाल

अर्चना घारेंचा आंदोलनाचा इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: July 24, 2023 18:57 PM
views 118  views

सावंतवाडी : पावसापुर्वी नियोजन न केल्यानं व अतिवृष्टीमुळे कोनशी दाभिल गावासह परिसरातील लाईट गेले पाच दिवस गायब आहे. तसंच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मनुष्य व वित्त हानी होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्यासह काही गावांतील ग्रामस्थांनी महावितरणला धडक दिली. उपकार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त वयोवृद्धानं आदी दक्षता घ्या, लोकांचे फोन उचला. बील नाही भरल तर घरी येतात तसे आता या असं सांगत असताना होणाऱ्या मनुष्य हानीबाबत नाराजी व्यक्त केली. सरकारकडून मेल्यानंतर दिले जाणारे 5 लाख होये खेका ?असा संतप्त सवाल विष्णू घाडी यांनी केला.


 महावितरणन पावसाळ्यापूर्वी दक्षता न घेतल्यान शहरासह कोनशी दाभिल, भालावल गावात लोकांना अंधारात रहायची वेळ आली आहे. ४० हून अधिक गाव अंधारात आहे. अधिकऱ्यांनी पावसापुर्वी न घेतलेली दक्षता याला कारणीभूत आहे. अधिकारी फोनही उचलत नसून लोकांनी जायच कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हि परिस्थिती येत्या चार दिवसांत न सुधारल्यास महावितरणसमोर सगळ्या ग्रामस्थांसोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिला आहे. 


दरम्यान, आपण नुकताच पदभार स्वीकारला असून काही अधिकारी, कर्मचारी फोन उचलत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यासंदर्भात माहिती घेऊन व पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लागलीच सर्व ठिकाणच्या तक्रारींचा विचार करून त्यावर तोडगा काढला जाईल असा शब्द उपकार्यकारी अभियंतांनी दिला.


यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहाराध्यक्ष सायली दुभाषी, सरचिटणीस हिदायतुल्ला खान, अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्षा राबिया शेख-आगा, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, भालावल गावचे सरपंच समीर परब, दाभिल ग्रामपंचायत मा. सदस्य विष्णू घाडी, हनुमंत जाधव, श्रीकांत कोरगावकर, श्रावणी कोरगावकर, नॉर्बर्ट डिसोजा, अनिल सरमळकर, वैभव परब आदी उपस्थित होते.