
सावंतवाडी : कोकणची पंढरी तथा सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी काल रात्री देवीच दर्शन घेतलं. लोटांगण कार्यक्रमाच्यावेळी त्या उपस्थित राहिल्या होत्या. सोनुर्लीत आलेल्या हजारो भाविकांंच त्यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
लोटांगणाचा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात अनेक भाविक आई समोर लोटांगण घालून आपला नवस फेडतात. या लोटांगण महोत्सवात सहभागी होत श्री देवी सोनुर्ली माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले. आईच्या व तिच्या लेकरांचा भक्तिपूर्वक सोहळा पाहून मन भारावले. आईसमोर नतमस्तक होत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली अशी भावना अर्चना घारेंनी व्यक्त केली.