मोहरम निमित्त जलाल शहापीर इथं अर्चना घारे-परब यांनी घेतलं दर्शन...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 28, 2023 15:31 PM
views 243  views

सावंतवाडी : मोहरम सणाच्या निमित्ताने बाहेरचावाडा येथील जलाल शहापीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दर्शन घेतले. सर्वांच्या सुख शांती व समृध्दीसाठी त्यांनी प्रार्थना करत मोहरम सणाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सरचिटणीस हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकुब शेख आदी उपस्थित होते.