शरद पवारांची अर्चना घारे - परब यांनी घेतली भेट

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत केली चर्चा
Edited by:
Published on: November 23, 2023 15:36 PM
views 222  views

सावंतवाडी : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी भेट घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत चर्चा केली. विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातील मौजे वेळाघर येथील पर्यटन विकास प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांची अधिकची जमीन अधिग्रहित होत आहे अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शरद पवार यांना मार्ग काढण्याची विनंती केली. यासह मतदारसंघातील विविध विषयांबाबत शरद पवार यांनी आपुलकीने चौकशी केली. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमनकर, शेतकरी संघटना अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, सल्लागार भाऊ आंदुर्लेकर, गजानन गवंडी, शेखर नाईक, संजय आरोसकर, तातू आंदुर्लेकर, प्रकाश गवंडी, महेश आंदुर्लेकर आणि चंद्रकांत नाईक उपस्थित होते.