अर्चना घारे - परब यांनी बजावला हक्क मतदानाचा

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 06:40 AM
views 195  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा भालावल येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे पती संदीप घारे यांनी देखील मतदानाच कर्तव्य पार पाडल. यावेळी कोकणवासीयांनी लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी व्हावं, कडक उन्हाळा असल्यानं स्वतःची काळजी घ्यावी अस आवाहन अर्चना घारे-परब यांनी यावेळी केले. तर इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हॅट्रिक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, संदीप घारे, विनायक परब, सिद्धी परब, वैभव परब,ऋतिक परब, रजनी गवस आदी उपस्थित होते.