धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या विषारी प्रचारात देखील सलोखा कायम राखला

अर्चना घारे-परब यांच पदाधिकाऱ्यांना आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2023 20:19 PM
views 195  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सेलच्या संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा करण्यात आली.पुढील काळात सेलच्या मार्फत विविध उपक्रम विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

"देशभरात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या विषारी प्रचारात देखील धार्मिक सलोखा कायम राखण्याचे काम सेलच्या वतीने करण्यात यावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केली.

या बैठकीसाठी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद खातीब, कार्याध्यक्ष नासीर शेख, अल्पसंख्यांक सेलचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष जावेद शेख, दोडामार्ग तालुकाध्यक्ष अबूबकर शहा, राष्ट्रीय सचिव असिफ ख्वाजा, बावतीस फर्नांडिस, दर्शना बाबर-देसाई, कैस शहा, नियाज शेख, हिदायतुल्ला खान, याकूब शेख, देवेंद्र टेमकर, फैजान शेख यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.