
सावंतवाडी: आम्ही लोबो आंन्टींचा आदर करतो. त्या ज्येष्ठ आहेत. त्यांचा पूर्ण सन्मान ठेऊन बोलते. त्यांना पाहून आम्ही म्हणजे अर्चना घारे आणि मी सालाईवाड्यात लहानाच्या मोठ्या झालो. अर्चना घारे या लहानपणी लोबो यांच्या शेजारीच राहत. जर त्या हे विसरल्या असतील की, अर्चना घारे भालावलच्या यशवंत परब यांच्या कन्या आहेत. त्यांच्या शेजारी लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही अर्चना घारेंचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, भालावलचा 7/12 पाठवून देतो. त्यातूनही त्यांच्या लक्षात येत नसेल तर लोबोंसोबतचे अर्चना घारेंचे लहानपणीचे काही फोटो पाठवून देतो. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल ही प्रिया परबांची अर्चना असा पलटवार राष्ट्रवादी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई यांनी केला आहे.
आपली मुलगी पुण्यासारख्या महानगरात जाते. शिक्षण, उद्योग व्यापार , राजकारण समाजकारणात आपल्या कोकणाचा नाव लौकिक मिळवते. म्हणुन ती आपल्याला उपरी, परकी होते का ? सिंधुदुर्ग चे जे भूमिपुत्र शिक्षण, उद्योग व्यापार, व्यवसायाससाठी बाहेर गेले ते सर्व उपरे, परके, बाहेरचे होतात का ? तुमची उपरे, परके ची व्याख्या काय ते पण एकदा सांगा अस आव्हान दिलं.