
सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा येथे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या घरी विराजमान असलेल्या गणरायाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी दर्शन घेतले. दरम्यान यावेळी तेथे पवार परिवारातील महिला – भगिनी गणराया चरणी पारंपारिक फुगडी घालत होत्या. पवार कुटुंबीयांची ही भक्ती पाहून अर्चना घारे परब यांना देखील आपल्या लाडक्या बाप्पा चरणी फुगडी घालण्याचा मोह आवरता आला नाही.
अर्चना घारे – परब यांनी देखील मोठ्या भक्ती भावाने गणराया चरणी पारंपारिक कोकणी पद्धतीने फुगडी घालून आपल्या गणेश भक्तीचे दर्शन घडविले. दरम्यान ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीला साजेसे वर्तन उच्च विद्याविभूषित असलेल्या अर्चना घारे – परब यांनी दाखविल्यामुळे उपस्थित पवार कुटुंबीय आणि गणेश भक्तांनी त्यांचे विशेष आभार मानत कौतुकही केले. यावेळी अर्चना घारे यांना फुगडीसाठी सौ चंद्रावती पवार, सौ अनुराधा पवार, सौ.शामल पवार, सौ शितल पवार, खुशी पवार,सौ प्रणिता पवार, सौ.नम्रता पवार, मंजिरी पवार, सौ.रोशनी पवार, राधाबाई पवार, अर्चना पवार, कोमल पवार, ज्योत्स्ना सातार्डेकर, अंकिता पवार यांनी साथ संगत दिली. यावेळी पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचे पवार कुटुंबीय व सातार्डा येथील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.