बंद असलेल्या CCTV चालू करण्याची मागणी

अर्चना घारेंनी वेधलं पोलीस अधिक्षकांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 19:01 PM
views 143  views

सावंतवाडी : बंद असलेल्या CCTV कॅमेऱ्यांकडे जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांंच कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी लक्ष वेधले.

तळकोकणातील सावंतवाडी व वेंगुर्ला ही शहरे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेली ही शहरे देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. दररोज हजारो पर्यटक या शहरांना भेट देत असल्याने येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मात्र शहरातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या CCTV कॅमेऱ्यांपैकी तब्बल 51 कॅमेरे बंद असल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांची व पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी सर्व CCTV कॅमेऱ्यांचे लवकरात लवकर मेंटेनन्स ऑडिट करावे व नादुरुस्त असलेले CCTV कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केली.


यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ॲड .रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, सावंतवाडी तालुका युवक उपाध्यक्ष विवेक गवस, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, अल्पसंख्याक सेल महिला तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, गौरांग शेर्लेकर, प्रकाश म्हाडगुत, वैभव परब, शेखर परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.