उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेतील : अर्चना घारे

Edited by: विनायक गांवस
Published on: July 23, 2024 12:32 PM
views 162  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे ? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेते सक्षम आहेत. त्यामुळे मी माझं काम करत राहणार, उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेतील. आपण काम करत राहायचं अस मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी व्यक्त केले.

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केलेल्या विधानाविषयी विचारलं असता त्या बोलत होत्या. त्याला उत्तर देताना अर्चना घारे परब म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे ? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेते सक्षम आहेत. त्यामुळे मी माझं काम करत राहणार आहे. निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अँड सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, पुजा दळवी, बाबल्या दुभाषी, ऋतिक परब आदी उपस्थित होते.