'त्या' मुर्तीकाराला अर्चना घारेंनी दिला धीर

Edited by: विनायक गावस
Published on: July 27, 2023 12:34 PM
views 170  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील परूळे गावातील मुर्तीकार सिद्धीविनायक तेली यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेचे गेल्या २ दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी या कार्यशाळेस भेट देत सिद्धीविनायक तेली यांना धीर दिला. ज्या ठिकाणी वर्षभर आपल्या बाप्पाच्या मूर्ती घडविल्या, त्या ठिकाणी एकाच पावसात होत्याचे नव्हते झालं असं मत त्यांनी व्यक्त केल.

तसेच वेंगुर्लाचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना संबंधित ठिकाणी पंचनामा करून मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची विनंती केली. यावेळी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, निवती ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे, कृषी सेलचे अध्यक्ष बाबा टेमकर, कुशाल बिडिये आदी पदाधिकारी उपस्थित होते.