कोकोशंभाला रिसॉर्ट मालकाची मनमानी | वेंगुर्ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल !

वेंगुर्ला गाडीअड्डा येथील संदीप आण्णाप्पा मोरे यांना शिवीगाळ व धमकी !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 24, 2022 17:38 PM
views 401  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथे स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये रस्त्याशेजारी लावलेला बोर्ड कोणी काढला, याबाबत जमिनी शेजारी असलेल्या कोकोशंभाला रिसॉर्टचे डायरेक्टर जाईल्स नँप्टन व सुहास मळेवाडकर यांना विचारणा केली असता आपल्याला त्यांनी जाईल्स नँप्टन यांनी अंगावर धावून येत शिवीगाळ करून धमकी दिली व सुहास मळेवाडकर यांनी त्याला प्रोत्साहन देत शिवीगाळ केली, अशी तक्रार वेंगुर्ला पोलिसात वेंगुर्ला गाडीअड्डा येथील संदीप आण्णाप्पा मोरे यांनी केली आहे. 

या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मी आज सुमारे २ वर्षे होतील, तेव्हापासुन मुंबई येथील अजय बबन चव्हाण यांच्या मालकीच्या भोगवे येथील भुमापन क्र. व उपविभाग ३/१३/२ या जमिनीची देखभाल करण्यासाठी केअरटेकर म्हणुन काम पाहातो. त्यांच्या जमिनीची देखभाल करतो. आमचे मालक हे मुंबई येथे राहात असल्याने व जमिनीची देखरेख व त्याची जपणुक, विकास योग्य प्रकारे व्हावा या करीता १९ नोव्हेंबर २२ रोजी त्या जमिनीचे कुलमुखत्यारपत्र माझ्या नावे केलेले आहे. त्या प्रमाणे मी त्या जमिनीचा विकास व देखभाल करत आहे.


दि. २१ नोव्हेंबर २२ रोजी दुपारी आपण नेहमी प्रमाणे भोगवे येथील माझ्या आखत्यारित असलेल्या जमिनीत जात असताना सदर जमिनीत रस्त्याशेजारी लावलेला नोटीस बोर्ड जागेवर दिसुन आला नाही. त्यामुळे मी जमिनीच्या शेजारी असलेल्या कोकोशंभाला हॉटेलचे डायरेक्टर जाईल्स नॅप्टन व सुहास नामदेव मळेवाडकर यांचेकडे याबाबत विचारणा केली असता जाईल्स नॅप्टन हे माझ्या अंगावर धावुन येऊन त्यांनी मला You bludy bastered, took Your notic board, If You come here again | Will Kill You असे म्हणुन शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यावेळी सुहास नामदेव मळेवाडकर हे त्यास प्रोत्साहन देत होते. दोघानीही मला शिवीगाळ करुन धमकी दिलेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


यामुळे जमिनीमध्ये रस्त्याशेजारी लावलेला गैलवानाईजचा (लोखंडी) 4 x 2 लांबी-रुंदीचा सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचा नोटीस बोर्ड आमच्या संमत्तीशिवाय चोरल्यामुळे व शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून संदीप मोरे यांनी तक्रार दाखल केली आहे.