भोसले फार्मसी कॉलेजमध्ये एम.फार्मसीच्या नवीन विषयाला मान्यता

Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 19:32 PM
views 109  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये एम.फार्मसीच्या नवीन विषयाला मान्यता मिळाली असून ‘फार्मास्युटिकल केमिस्ट्री’ या विषयात विद्यार्थी आता पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. कॉलेजमध्ये २०२० पासून एम.फार्मसी अभ्यासक्रम सुरू असून त्यामध्ये ‘फार्मास्युटिक्स’ हा विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहे. आता याठिकाणी 'फार्मास्युटिकल केमिस्ट्री' हा विषय सुरू करण्यास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, तंत्रशिक्षण विभाग व मुंबई विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली असून विद्यार्थी चालू वर्षी प्रवेश घेऊ शकतात. 

एम.फार्मसीचा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून चार सत्रात विभागला गेला आहे. यापैकी पहिल्या व दुसऱ्या सत्रात विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना शिकतात आणि तिसऱ्या व चौथ्या सत्रात प्रात्यक्षिकांसह नवीन संशोधनावर भर दिला जातो. एम.फार्मसीला प्रवेश मिळण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान ५५टक्के व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५०% टक्के गुण आवश्यक असतात. तसेच जी- पॅट परीक्षा देणेही बंधनकारक आहे. या नवीन अभ्यासक्रमासाठी विषय तज्ञ म्हणून डॉ.गौरव नाईक यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी आयआयटी, बीएचयू येथून डॉक्टरेट संपादन केली आहे. 

कॉलेजमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी प्राचार्य डॉ. विजय जगताप व विभाग प्रमुख प्रा.रश्मी महाबळ यांचे अभिनंदन केले व नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.