देवगड - वैभववाडीतील 13 कोटी 37 लाखाच्या पुलांच्या कामांना मंजूरी !

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 25, 2024 08:18 AM
views 196  views

कणकवली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 नाबार्ड अर्थसहाय्यमधून आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 कोटी 37 लाख रकमेच्या पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून या कामांची वारंवार मागणी होत होती.

सदर कामांना मंजुरी मिळाल्याने जनतेची होणारी दळणवळणाची गैरसोय दूर होऊन जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये 1) फणसगाव महाळुंगे गढीताम्हाणे वळीवंडे रस्ता साखळी क्रमांक 4/200 वर पुलाचे बांधकाम करणे. (रुपये 11 कोटी 54 लाख)

2) सांगुळवाडी फाटकवाडी रस्ता साखळी क्रमांक 3/100 वर पुलाचे बांधकाम करणे. (रुपये 1 कोटी 83 लाख) ही कामे मंजूर झाली आहेत.