
सावंतवाडी : सध्या सावंतवाडी - नृसिंहवाडी एसटी बसच्या चालकाचा एसटी बस स्वच्छ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चालक अमोल भिरवंडेकर यांची कृती अनेकांना भावली असून लालपरीवर प्रेम करणाऱ्यांची मन जिंकायच काम या चालकान केलं आहे. दरम्यान, याबाबत चालकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याच काम सावंतवाडी डेपोतील कर्मचाऱ्यांनी केलं आहे. श्रीमती फाले यांच्या हस्ते चालकास पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी एसटी डेपोचे वरिष्ठ लिपीक रामचंद्र वाडकर, कार्यशाळा प्रमुख संदीप मोहिते, अजित कदम, नकुल कांबळी,श्री. सांगवेकर, श्री. ताटे आदी उपस्थित होते.