
देवगड : देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणारा हर्ष शिवाजी कुबल याने मे महिन्यामध्ये मालवण येथील जेटीवर बुडणाऱ्या एका पर्यटकांचा जीव वाचविल्याबद्दल संस्थेच्या स्थानीय समितीचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष असलेल्या ॲड. अविनाश माणगावकर यांच्या शुभहस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी हर्ष कुबल याच्या धाडसाचे कौतुक करून भविष्यात देखील अशीच धाडशी वृत्ती अंगी जोपासण्याचे आवाहन केले आहे. यावेळी देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, संस्थेचे मुख्य चिटणीस शंकर धुरी, मुख्याध्यापक महादेव घोलराखे पर्यवेक्षिका निशा दहिबावकर शिक्षक वर्ग हर्ष चे पालक आदी उपस्थित होते.