जलजीवन मिशनच्या कामांसाठी म्हापण ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय टीमकडून कौतूक..!

Edited by: संदीप देसाई
Published on: October 10, 2023 19:43 PM
views 21  views

सिंधुदुर्ग :  म्हापण ग्रामपंचायतीने गावामध्ये जलजीवन मिशन अतीशय चांगल्या प्रकारे राबविलेले असुन या योजनेच्या माध्यमातून गावातील कुटूंबांना नळाद्वारे नियमित व सुरक्षित दरमाणशी दरदिवशी ५५ लिटर पाणी पुरविण्याचे काम ग्रामपंचायत करीत आहे. हरघर जल या संकल्पनेतून गावातील ६४ गरजू कुटूंबांना नळकनेक्शन देण्यात आलेली आहेत. तसेच गावातील बचतगटाद्वारे नळयोजना चालविली जात असुन ही बाब खरीच कौतूकास्पद असुन याचा आदर्श अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा” असे गौरवोद्गार म्हापण ग्रामपंचायतीची जलजीवन कामाची तपासणी करण्यासाठी आलेल्या राज्यस्तरीय समितीने काढले.

या समीतीमध्ये सुषमा सातपुते – अभियान संचालक,  मनिषा पालांडे – मुख्य अभियंता (राज्य),  . उदयकुमार महाजनी – कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पू.) जि. प. सिंधुदुर्ग, श्री.वाळके – उप कार्यकारी अभियंता,.प्र फुल्लकुमार शिंदे – उपअभियंता ग्रा.पा.पू , द्रौपदी नाईक – गटसमन्वयक वेंगुर्ला आदी अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता. प्रारंभी सरपंच सौ. आकांक्षा चव्हाण यांनी गावाच्या वतीने मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. यावेळी उपसरपंच श्रीकृष्ण ठाकुर, ग्रा.पं. सदस्य  गुरुनाथ मडवळ,ग्रामविकास अधिकारी  तुषार हळदणकर पाणी गुणवत्ता तपासणी करणार्‍या स्वयंसेवक महीला, अन्य कर्मचारी व ग्रामस्थ लाभार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. या समितीने गावातील कामांची प्रत्यक्ष पाहाणी करून चांगल्या कामांसाठी ग्रामपंचायतीचे कौतूक केले आहे.