पत्रकार पाल्यांचा 13 जूनला गुणगौरव सोहळा

कणकवली पत्रकार संघाच्यावतीने आयोजन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 10, 2025 20:32 PM
views 96  views

कणकवली :  कणकवली तालुका पत्रकार  संघाच्यावतीने पत्रकारांच्या 10 वी , 12 वी पदवीभर , डिप्लोमा , क्रिडा व अन्य क्षेत्रात यश मिळवलेल्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा 13 जून रोजी सकाळी 10.30 वाजता कणकवली पंचायत समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रांताधिकारी जगदीश कातकर, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, परिषद प्रतिनीधी गणेश जेठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकार व पत्रकारांच्या पाल्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे यांनी केले आहे.