अमेय गावडेचं कौतुकास्पद कार्य..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 07, 2023 13:28 PM
views 412  views

सावंतवाडी : पडवे येथील एस एस पी एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या मालवण तालुक्यातील चुनवरे येथील प्रभावती रत्नु जाधव या महिलेला ए बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज असल्याचे समजताच सिंधूरत्न रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि नियमित रक्तदाते अमेय रमेश गावडे (ओटवणे) यांनी या महिलेसाठी तात्काळ पडवे एस एस पी एम रुग्णालयातील रक्तपेढीत जात रक्तदान केले.

या दुर्मिळ रक्तगटाबाबत या महिलेच्या नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे महेश राऊळ यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यानी या दुर्मिळ रक्तगटाचे ओटवणे येथील दाते अमेय गावडे यांच्याशी संपर्क साधला. अमेय गावडे यांचे हे ८ वे रक्तदान असून यापूर्वीही त्यांनी तात्काळ रक्तदान करीत अनेकांचे जीव वाचविले आहेत. या अमूल्य रक्तदानाबद्दल या महिलेच्या नातेवाईकांनी अमेय गावडे यांच्यासह सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत.