राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी तालुकाध्यक्षपदी वैभव रावराणे यांची नियुक्ती

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 29, 2023 17:46 PM
views 143  views

वैभववाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी तालुकाध्यक्षपदी वैभव रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.वैभववाडी तालुक्याची जबाबदारी युवा नेतृत्वावर देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटाकडून संघटना बांधणीवर भर दिला आहे.जिल्ह्यात नविन कार्यकारिणी जाहीर झाली.आता तालुका कार्यकारण्या जाहीर होत आहेत.वैभववाडी तालुक्याच्या तालुकाध्यक्ष पदी श्री रावराणे यांची निवड झाली आहे.

निवडीलनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.रावराणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुनील तटकरे,मंत्री हसन मुश्रीफ,मंत्री अदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांचे आभार मानले. तसेच तरुण वयात दिलेल्या जबाबदारीच सोन करून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम उभी करणार आहे.महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेना यांना ही विश्वासात घेऊन एकत्रित तालुक्यात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .