
मुंबई : डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्यच्या कोकण विभाग अध्यक्षपदी सिताराम गावडे यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार दिनाचं औचित्य साधून जाहीर केली आहे. आपल्या वैयक्तिक कारणामुळे सागर चव्हाण यांनी कोकण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा नुकताच राजा माने यांच्याजवळ सुपूर्द केलाय.
राज्यातील नव्हे तर देशातील पहिल डिजीटल महाअधिवेशन सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचं गाव म्हणून जगप्रसिध्द असलेल्या भिलार इथ घेण्याचं ऐतिहासिक काम नुकतच डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनने करुन दाखविल होत. या अधिवेशनाच्या निमीत्ताने राज्यभरातील हजारो पत्रकार बांधवांची एकजूट दिसून आली होती. त्यामुळे संघटनेच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल प्रशासनाला देखील घ्यावी लागली. या अधिवेशना, दरम्यान कोकणसाद LIVE आणि कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांची कोकण विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली होती. कोकण विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर सागर चव्हाण यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड अश्या तीन जिल्ह्यांची कार्यकारणी जाहीर केली होती. देशातील पहिल डिजीटल महाअधिवेशन यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शेकडो पत्रकार महाअधिवेशनात सहभागी झाले होते. दरम्यान, वैयक्तिक कारणामुळे संघटनेला पुरेशा वेळ यापुढे देऊ शकत नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांपुर्वी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्याजवळ आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता.
आज पत्रकार दिनाच औचित्य साधून कोकण विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी सागर चव्हाण यांच्या समंतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युजचे संपादक सिताराम गावडे यांच्याजवळ सोपविली.
सिताराम गावडे यांनी १९९० पासून कोकणसाद या दैनिकातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. १९९२ मध्ये ते दै. रत्नागिरी टाइम्स मध्ये सावंतवाडी प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. २००१ मध्ये त्यांनी स्वतःच 'आमची एकजूट' हे त्रैमासिक काढले. त्यांनतर त्यांनी दै. सागर, दै. नवाकाळ, दै. रत्नागिरी एक्स्प्रेस, दै. महासत्ता, दै. पुण्यनगरीमध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं. २०१५ मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. त्याच दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी देखील त्यांची बिनविरोध निवड झाली. २०१७ मध्ये त्यांनी डिजिटल मिडिया क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. ते आज कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.