संदीप साटम यांची कणकवली विधानसभा संयोजकपदी नियुक्ती

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 11, 2024 13:28 PM
views 345  views

देवगड : भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांची कणकवली विधानसभा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली.संदीप साटम भाजप जिल्हासरचिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. आता पक्षाने त्यांच्यावर कणकवली विधानसभा संयोजक पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही नियुक्ती केली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच आमदार नितेश राणे यांनी त्यांना दिले आहे.

यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, माजी जि. प अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आदींसह भाजप जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा आपला मानस आहे. तसेच पक्षाने दिलेल्या दोन्ही जबाबदाऱ्या मी यशस्वीपणे संभाळत पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे मत यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस तथा विधानसभा संयोजक संदीप साटम यांनी व्यक्त केले आहे.