
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,1961 (सन 1962 चा अधिनियम,5)चे तरतुदी अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रिंयासह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 च्या प्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत, प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्र. उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे.
या आरक्षणाची माहिती पाहण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तहसिलदार कार्यालय, व जिल्ह्यातील सर्व पंचयात समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्या त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना तहसिलदार, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे दिनांक 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.