आपा गवस यांनी पिकुळेत आणली विकासगंगा..!

Edited by: संदीप देसाई
Published on: February 12, 2024 15:00 PM
views 107  views

दोडामार्ग :  पिकुळे गावात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातुन विवीध योजनेंतर्गत एकच वर्षात सुमारे एक कोटींची कामे मंजूर झाली असून या कामांचा शुभारंभ नुकताच मोठ्या दिमाखात शिवसेना पदाधिकारी व सरपंच, गावकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. एकाच वर्षात पिकूळे गावाला प्रथमच इतका निधी उपलब्ध झाल्याने पिकुळे गाव आता खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया गावचे सरपंच आपा गवस यांनी दिली आहे.

या मंजूर कांमाच दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवुन भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,  जिल्हा समन्वयक शैलेश दळवी,  तालुकासंघट गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख दादा देसाई,  उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, पिकुळे गावचे प्रथम नागरिक सरपंच  आपा गवस, उपसरपंच नीलेश गवस महीला उपतालुकाप्रमुख सौ. पुजा देसाई, संदीप गवस, झोंळबे सरपंच  विशाखा नाईक,  ग्रामपंचायत सदस्य  शंकर गवस, आनंद गवस, फटी गवस, तुकाराम गवस, सुभाष गवस, दिनेश गवस, प्रवीण गवस, सुदंर नाईक व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. विविध योजना अंतर्गत पिकुळे हरिजनवाडी येथे लहान मुलाचे बांधकाम करणे 37 लाख, देऊळवाडी ते भेडशी पिकुळे रस्ता संरक्षक भिंत बांधणे 38 लाख, पिकुळे खालची लाडाचे टेंब गौरी विसर्जन वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 4 लाख, अलकाचे टेंब रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख या कामांना आमदार निधी, दलित वस्ती सुधार योजना, डोंगरी विकास निधी व राज्याच्या बजेट मधून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व पिकुळे गावचे सुपुत्र तीलकांचन गवस, संदीप गवस सरपंच आप्पा गवस यांसह पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाल असून  गावांमध्ये एकाच वर्षी मोठ्या प्रमाणात विकास काम मंजूर झाली. त्यामुळे पिकुळे गावातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केल आहे.