
दोडामार्ग : सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना वेळोवेळी धावपळ करीत असलेल्या पत्रकार मित्रांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या आरोग्या विषयी कोणतीही समस्या उद्भवल्यास आम्हांला कधीही हाक द्या, तुमच्या सेवेसाठी आम्हीं सदैव तत्पर आहोत असे अभिवचन डॉ. एवळे यांनी दोडामार्ग मधील पत्रकारांना दिलं. पत्रकारांच्या सहकार्यामुळे दोडामार्ग रुग्णालयाचे अनेक प्रश्न मार्गी लागलेत. तालुक्यातील लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी सतत प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना सदैव निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा वैदयकीय अधिकारी ज्ञानेश्वर एवळे यांनी पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात बोलताना दिल्या.
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दोडामार्ग रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरात ते बोलत होते. यावेळी दोडामार्ग तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास देसाई, सचिव महेश लोंढे, जिल्हा पत्रकार समितीचे माजी सदस्य व दोडामार्ग पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप देसाई, पत्रकार तेजस देसाई, संदेश देसाई, तुळशीदास नाईक, समीर ठाकूर, भूषण सावंत वैद्यकीय अधिकारी डॉ. रेडकर, यांसह सरपंच सासोली खुर्दचे प्रवीण गवस, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो उपस्थित होते. या शिबिरात सहभागी झालेल्या पत्रकारांची ब्लड प्रेशर, सीबीसी, एच. बी, शुगर, नेत्र तपासणी अशा येथील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकरच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व प्रकारची यावेळी संदीप देसाई, तुळशीदास नाईक यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास देसाई यांनी केले. तर आभार संदेश देसाई यांनी मानले.