हेवाळेची अनुजा देशात चमकली | नवोदयच्या परीक्षेत देशात ७ वा क्रमांक

सीबीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेत ९८.१७ टक्के गुण
Edited by: संदीप देसाई
Published on: October 20, 2022 16:44 PM
views 313  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पंचायतराज क्षेत्रात सरपंच संदीप देसाई यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत गावाला अनेक पुरस्कार देत राज्यात ज्याप्रमाणे चमकवल होत. अगदी तीच परंपरा हेवाळे गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुजा मनोहर देसाई या विद्यार्थिनींन उत्तुंग यश संपादन केलंय. नवोदय विद्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत तिने ९८.१७ टक्के गुण मिळवून संपूर्ण देशातून ७ वा क्रमांक पटकावला आहे. आपल्या गावा बरोबरच दोडामार्ग तालुक्याचे नाव उज्वल करणाऱ्या कु. अनुजाचा दोडामार्ग शहर नगरपंचायतने नगरपंचायत तर्फे विशेष सन्मान करत तिचे कौतुक केल आहे. 

     कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या शिक्षण व आरोग्य सभापती सौ. गौरी पार्सेकर यांच्या हस्ते कु. अनुजाचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी सोंडगे, उपनगराध्यक्ष देवीदास गवस बांधकाम सभापती नितीन मणेरीकर ,  महिला व बाल कल्याण सभापती सौ . ज्योती जाधव, नगरसेविका क्रांती जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष यांनी अनुजाला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत तिला पुढील शिक्षणासाठी व तिच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे.  हेवाळे गावातील शेतकरी मनोहर  शिवाजी देसाई, सौ . मंजिरी देसाई यांची अनुजा ही कन्या आहे. ती सांगेली येथील नवोदय विद्यालयात आता अकरावीत शिकत आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल गावचे माजी सरपंच संदीप देसाई यांनी सुद्धा विशेष अभिनंदन करत गावासाठी ही फार अभिमानास्पद बाब असल्याचे स्पष्ट केले आहे.

अनुजा ही फक्त हेवाळे गावचीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवत्तेची खाण असून ती भविष्यात सुद्धा यापेक्षा अधिक गरुडझेप घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तिच्या या देशाने आपल्या गावचे नाव संपूर्ण देशात पोहोचल्याचा अभिमान असल्याचे सांगत देसाई यांनी खास कौतुक केलं आहे.