कणकवली न.पं.ची प्लास्टिक विरोधी कारवाई !

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 26, 2023 19:21 PM
views 371  views

कणकवली : नगरपंचायतच्यावतीने मंगळवार बाजाराच्या दिवशी 75 मायक्रोनच्या खाली प्लॅस्टिक पिशवी वापरणाऱ्या 10 व्यापाऱ्यांवर  कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी परितोष कांकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सिटी कॉर्डिनेटर वर्षा जाधव, प्रकाश राठोड, संदीप तांबे, पूजा जाधव या पथकाने सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. या कारवाईत 15 किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून 3600 रुपये दंडदेखील आकारण्यात आला आहे.