

वेंगुर्ला : श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळ अणसूर यांच्या वतीने गावात मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करण्यात आला असून या क्लासचे उदघाटन प्रसिद्ध आंबा बागायतदार विजय कृष्णा सरमळकर यांच्या हस्ते १३ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक नाथा गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोपी गावडे, आपा गावडे, बिटू गावडे, विजय धर्माजी गावडे, जयवंत अकॅडमि चे कांबळी सर, देविदास गावडे, उदय गावडे, बाबी गावडे, संदेश गावडे, प्रभाकर गावडे, कुमार गावडे तसेच मंडळाचे अध्यक्ष नितीन अणसुरकर, उपाध्यक्ष सुनील गावडे, खजिनदार सिद्धेश गावडे सचिव गजमुख गावडे, भाऊ मालवणकर तसेच सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गजमुख गावडे याने केली. यावेळी नाथा गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मंडळासाठी तसेच क्लास च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या क्लासेस मध्ये अणसूर गावातील एकूण ३० मुलांनी सहभाग घेतला. मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले व या क्लासला सुरुवात कारण्यात आली तसेंच आनंद जयवंत गावडे ( बिटू गावडे ) यांचकडून वह्या वाटप करण्यात आले. यावेळी गावात शैक्षणिक व क्रीडात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळाचा मानस आहे असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.