
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर - शिरवलकर यांनी एका मताने बाजी मारली. अडीच वर्षानंतर अडीच वर्षानंतर महायुतीला वर्चस्व सिद्ध करता आले. आमदार निलेश राणे यांनी मात्र हा विजय महायुतीचा आहे. केवळ विकासासाठीच आम्हाला मतदान केले. येत्या काळात कुडाळमध्ये विकास काय असतो दाखवून देऊ असे सांगितले.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. या सभेत एकूण १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सई काळप यांना ८ मते तर भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना ९ मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एक मत फुटले. ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका श्रुती वर्दम यांचे मत निर्णायक ठरले . नगराध्यक्ष निवडीनंतर महायुतीकडून जल्लोष करण्यात आला. आमदार निलेश राणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले. यावेळी महायुतीकडून जल्लोष करण्यात आला.