
सावंतवाडी : आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस संचलित, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२२-२3 बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी अध्यक्ष व उदघाटक म्हणून सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे, तर प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून करियर गाईडन्स समुपदेशक प्रा. रुपेश पाटील, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राचार्य अल्ताफ खान, प्रभाकर नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास आरोस पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी, माजी विद्यार्थी, पालक वर्ग यांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निलेश शिवाजी परब (अध्यक्ष, आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस), हेमंत नारायण कामत (अध्यक्ष, शालेय समिती), कु. अपूर्वा अ. नाईक (शालेय मुख्यमंत्री), सदाशिव र. धुपकर (मुख्याध्यापक), प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (सांस्कृतिक विभाग प्रमुख), संतोष म. पिंगुळकर (उपाध्यक्ष, पालक-शिक्षक संघ) यांनी कळविले आहे.