कुडाळ तालुका पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा | १५ टक्के लाभांशांची घोषणा

Edited by: भरत केसरकर
Published on: August 27, 2023 19:31 PM
views 427  views

कुडाळ : कुडाळ तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सरकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभेत आज तब्बल १५ टक्के लाभांश वर शिक्कामोर्तब करण्यात आला.या सभेत यावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन चार दिवसात त्याचे वाटप करण्यात येणार आहे. कुडाळ येथील मराठा हाॅल येथे चेअरमन चंद्रकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सभा संपन्न झाली.

यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन विलास पालकर,विद्यानंद पिळणकर,गिरीष राऊळ,सुजित गंगावणे,दिनेश म्हाडगुत,निखील आरोलकर,उमेश सावंत,दिपक तारी,सुनिल नाईक,अनिल वारंग,श्रद्धा कुलकर्णी,सौ.अंकिता मोडक,गिरीश गोसावी,तज्ञ संचालक नारायण कोठावळे संचालक मंडळ उपस्थित आहेत.सभासदांच्या गुणवंत मुलांचा, विद्यार्थी व निवृत्त सभासदांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना हळदीचे नेरूर हायस्कूल चे निवृत्त मुख्याध्यापक शंकर कोराणे म्हणाले मी जेव्हा कुडाळ तालुक्यामध्ये नोकरीसाठी लागलो, त्यावेळी या पतपेढीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यावेळी फार कमी कर्ज मिळत होते.मात्र आता पगार वाढल्याने आता घर बांधण्यासाठी उपयुक्त असे लाखो रुपये एका मिनिटांमध्ये पतपेढी देत आहे. पतपेढी भविष्यात अशाच पद्धतीने वाढत राहो. या पतपेढीने केलेले सहकार्य मी कदापिही विसरू शकणार नाही. असे कोराणे यांनी स्पष्ट केले. मात्र एखाद्या सभासदाला लाखो रुपयासाठी जामीन राहिल्यानंतर त्या सभासदाचे बरे वाईट झाल्यास जामीनदारावर सर्व जबाबदारी येते. यासाठी काहीतरी तरतूद करणे गरजेचे असल्याचेही कोराणे यांनी स्पष्ट केल.निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच जनरल सभा असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

मात्र, नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन विरोध करणारे मराठा महासंघाचे अध्यक्ष दिनेश म्हाडगुत तसेच अनेक विरोधक संचालक म्हणून निवडून गेल्याने आणि व्यासपीठावर बसल्याने विरोधी सुरच या सभेमध्ये कमी झालेला पाहायला मिळाले.चेअरमन चंद्रकांत चव्हाण यांनी अतिशय शांत व संयमाने सभा चालवत विरोधक व सत्ताधारी सभासदांना आपल्या शाब्दिक कौशल्याने खेळवत ठेवत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा चालवली. एरवी सात आठ तास चालणारी वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासावर आटोपली. त्यामुळे सर्वांनीच चेअरमन चंद्रकांत चव्हाण यांचे आजच्या सभा चालविल्याबद्दल कौतुक केले. या सभेला शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर,प्रशांत आडेलकर,माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड, आल्हाद शिरसाट,सलीम तकीलदार,बाळा कडव,विश्वास धुरी,विठोबा कडव,श्री गावकर,श्री खरात, श्री पाटील, अविनाश परीट, पोपटराव कदम, माणिक पवार,सुशील कुमार, आनंद राठये, अनिकेत वेतुरेकर आदी उपस्थित होते.प्रास्ताविक विष्णू मोर्ये आणी आनंद राणे यांनी केले तर चेअरमन चंद्रकांत चव्हाण यांनी आभार मानले.