
देवगड : देवगड तालुक्यातील किंजवडे येथील किंजवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.किंजवडे - आरे या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २७-९-२०२४ रोजी पार पडली या सोसायटीचे चेअरमन किरण टेंबुलकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.यावेळी उपस्थित सभासदांकडून सभासदांच्या संस्थेच्या संचालकांच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून अभिनंदन ठराव घेण्यात आला.
त्या ठिकाणी संस्था सभासद तसेच किंजवडे हायस्कूलचे स्थानिक कमिटी अध्यक्ष रामभाऊ परब, मुख्याध्यापक आनंद कदम यांचा सत्कार देखील करण्यात आला.यावेळी चेअरमन किरण टेंबुलकर यांचा विशेष अभिनंदन ठराव देखील करण्यात आला. कारण सलग दोन वर्षांच संस्थेकडून चेअरमन पदाच मिळणारा मानधन हे किंजवडे हायस्कूलला दिल्याबद्दल अभिनंदन ठराव करण्यात आला.
तसेच गेली 16 वर्षे किंजवडे हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागतो याबद्दल संस्थेच्या वतीने हायस्कूलचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी व्हाईस चेअरमन संतोष किंजवडेकर, संचालक संजय आचरेकर, संदीप कदम ,शाहू वरक, सुनील कदम, अरविंद भोगले ,वंदना घाडी, सरिता तळवडेकर,दीपक पाडावे,सचिव विश्वनाथ घाडी, दिक्षिता लोके,आदी ग्रामस्थ गावातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.