दाभिलच्या ग्रामदैवतेचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 23, 2023 15:31 PM
views 127  views

सावंतवाडी : दाभिल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कालिका देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा जय हनुमान दशावतार कंपनीचे (आरोस) नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच दाभिल ग्रामस्थांनी केले आहे.