
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेच्या दोडामार्ग तालुका कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. या संघटनेच्या दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी जय भोसले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी शाबी तुळसकर यांची तर सचिवपदी निलेश तळणकर यांची निवड करण्यात आली.
या कार्यकारिणीत सदस्य म्हणून राकेश महाजन, संजय डुबळे, कृष्णा नाईक,महेंद्र करमळकर,विश्वनाथ गवस,चंद्रा आयनोडकर,शानी बोर्डेकर,प्रदीप धुरी,विजय गवस,प्रकाश नाईक यांची निवड करण्यात आली.तर तालुका निरीक्षक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष अभय नाईक(बांदा) यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे,सचिव बाबली वायंगणकर,उपाध्यक्ष अभय नाईक,सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रा.शरद शिरोडकर,कणकवली तालुकाध्यक्ष प्रा.सत्यवान राणे,सदस्य राजा राणे यांच्यासह दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण,मनोज पार्सेकर आदी उपस्थित होते.४० वर्षांवरील क्रिकेट खेळाडूंसाठी ही संघटना कार्यरत असून युवा खेळाडूंसाठीही ही संघटना विविध उपक्रम राबवत असते.दोडामार्ग तालुक्यातही आता या संघटनेमुळे विविध स्पर्धा व उपक्रम घेतले जाणार आहेत.या नवीन कार्यकारणीचे दोडामार्ग तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.