मराठी भाषा अभ्यासक - संवर्धनसाठी महाराष्ट्र शासनाकडून 4 पुरस्कारांची घोषणा !

कुडाळचे सुपुत्र डॉ. प्रकाश परब यांना मानाचा पुरस्कार
Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 18, 2024 12:03 PM
views 532  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचे अभ्यासक असणाऱ्या व या भाषेचे संवर्धन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पुरस्कारासाठी सन 2023 साठी निवड केली आहे. महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारी, मराठी भाषा, आपली संस्कृती व त्याचे संवर्धन संगोपन व संरक्षण करण्याच्या हेतूने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

सिंधुदुर्ग कुडाळचे सुपुत्र डॉ. प्रकाश परब  यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

डॉ. अशोक रा. केळकर यांच्या नावे मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार तर कविवर्य मंगेश पाडगावकर  यांच्या नावे मराठी भाषा संवर्धन विषय पुरस्कार  जाहीर झाले असून दोन व्यक्ती व दोन संस्थाना हे पुरस्कार  जाहीर झाले आहेत. डॉ.अशोकराव केळकर मराठी भाषा अभ्यासक  व्यक्ती पुरस्कार डॉक्टर प्रकाश परब ( कुडाळ, डोंबिवली )यांना तर संस्थेचा पुरस्कार वाड:मय चर्चा मंडळ (बेळगाव)  यांना, तर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार श्री कोतीकराव ठाले पाटील व संस्थेचा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक)  या दोन व्यक्ती व दोन संस्थांना जाहीर झाला आहे. मराठी भाषिकांच्या वतीने या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांचे कौतुक होत आहे.

डॉ. प्रकाश परब हे  कुडाळचे सुपुत्र असून डोंबिवली व कुडाळ येथे त्यांच्या वास्तव्य आहे.मुंबई मुलुंड येथील वझे केळकर महाविद्यालयाचे ते  मराठी विषयाचे प्रमुख होते. मराठी समाज भाषा विज्ञान व व्याकरण या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. शासनाचे व अन्य असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मराठी भाषा विषयक अनेक पुस्तके त्यांचे प्रकाशित झाली आहेत.  मराठी भाषा  समाज व शासन हे आगामी पुस्तक त्यांचे प्रकाशित होणार आहे. राज्य शासनाचा हा मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे.