दृष्टीहीन व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न : देव्या सूर्याजी

दृष्टीहीन संघाच्या कोकण शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
Edited by: विनायक गावस
Published on: August 01, 2023 16:59 PM
views 196  views

सावंतवाडी : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा कोकणचा वर्धापन दिन सावंतवाडीत पार पडला.  मोठ्या संख्येने दृष्टिहीन बांधव यावेळी उपस्थित होते.काझी शहाबुद्दीन हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होत.राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखेच्यावतीन  वर्धापनदिनी दृष्टीहीन बांधवांचा सन्मान करत त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.


याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी म्हणाले, दृष्टिहीन व होतकरू व्यक्तींना रोजगाराच्या तसेच आत्मनिर्भर बनण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्यावतीने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दृष्टीहीन व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अधिक प्रयत्न यापुढे केले जातील अस मत देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केल.


तर जिल्ह्यातील दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्याचे प्रयत्न या संघटनेचे असतील जेणेकरून त्या व्यक्तींना रोजगार मिळेल. तसेच संकटाच्या काळात मदत करता आली नाही याची खंत मनात आहे असं मत कल्पना बांदेकर यांनी व्यक्त केली. तर, आता जेवढी मदत लागेल तेवढी मदत मी करेन असि विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींसाठी रात्रंदिवस काम करण्यासाठी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सदैव तत्पर आहेत असं मत रवी जाधव यांनी व्यक्त केल.

       

यावेळी कल्पना बांदेकर यांचे संघटनेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दृष्टीहीन व्यक्तींना बॅग व अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी दृष्टीहीन संघटनेचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सचिव शेखर आळवे,प्रतीक बांदेकर, प्रथमेश प्रभू, सुरज मठकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.