
सावंतवाडी : निरवडे येथील श्री देवी सातेरीचा वर्धापन दिन गुरुवारी होत आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
निरवडे येथील श्री देवी सातेरीचा सालाबादप्रमाणे वर्धापन दिन गुरुवारी होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती व तीर्थप्रसाद त्यानंतर महाप्रसाद, स्थानिक ग्रामस्थांची भजने आणि रात्री साडेनऊ वाजता सप्तरंग कला मंच होडावडा यांचे श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित ब्रम्हांडनायक महान पौराणिक संगीत दोन अंकी ट्रिक्सनयुक्त नाटक होणार आहे. तरी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.