एम.जे. डान्स अकॅडमीचा वर्धापन दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 10, 2025 20:01 PM
views 20  views

सावंतवाडी : नृत्य क्षेत्राला आता फार मोठे ग्लॅमर मिळत आहे. रोजगाराच्या संधी आहेत. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने नवोदित कलाकारांनी या क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे असे प्रतिपादन एम.जे.डान्स अकॅडमीच्या संचालिका सौ.स्नेहल जांभोरे यांनी केले. एम.जे. डान्स अकॅडमीचा वर्धापन दिन येथील सावंतवाडी उद्यानात शेजारी साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शैलेश सोन्सुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एम.जे डान्स अकॅडमी चे संचालक महेश जांभोरे, सिंधुदुर्ग डिजिटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माडखोल मंडळ अधिकारी देवबाप्पा बोडके, शुभम वैद्य, शुभम धरी, विनायक कोंडल्याळ, वर्षा कोंडल्याळ, कोरिओग्राफर निक तिमानिया, घनश्याम सोनवणे, प्रवीण गावडे वीरेंद्र सावंत आदी उपस्थित होते. याविषयी जांभोरे म्हणाल्या, आता इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ निर्माण होऊ शकते. मात्र, त्यासाठी आपल्या अंगात असलेली कला शिस्तबद्ध मांडण्याची गरज आहे. त्यासाठी कठोर परिश्रम घेऊन मुलांनी नृत्याचे धडे घ्यावेत. यावेळी श्री टेंबकर म्हणाले, महेश जांभोरे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे एम जे अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम होत आहे, ही कौतुकाची बाब आहे. या ठिकाणी नृत्याचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनेक सिनेमांमध्ये तसेच अल्बम मध्ये काम मिळाले. त्यामुळे अगदी कमी वयात त्यांची स्वतःची अशी ओळख झाली. हे पालकांसाठी क्रेडिट ठरणारे आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या डान्स अकॅडमीच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध नृत्याचे धडे घ्यावेत आणि आपले करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करावेत

यावेळी विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले. कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून भार्गवी पांगम तर लहान गटातून रेणुका परब हे दोघे स्पर्धक विजेते ठरले तर वैष्णवी बोडके, शौर्य सोन्सुरकर,काव्या गावडे,श्रावणी कुंभार आर्वी कोलियाड यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप शिरोडकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सावंत जांभोरे मनीष सावंत आणि किरण नाईक यांनी परिश्रम घेतले.