माणगाव खोऱ्याला जोडणारा आंजिवडा मुख्य रस्ता विशाल परब यांनी स्वखर्चाने दिला करून...!

Edited by: भरत केसरकर
Published on: June 24, 2023 13:36 PM
views 272  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आंजीवडे यागावात जाणारा रस्ता हा गेले आठ दिवस वाहतुकीस पूर्णपणे बंद होता. माणगाव खोऱ्याला जोडणारा हा मुख्य रस्ता खचल्याने वाहतुक तब्बल आठ दिवस बंद होती. आंजीवडे ग्रामस्थांनी याभागातील सर्व लोकप्रतिनिधी कडे पाठपुरावा करून कोणताही उपयोग झाला नाही.

अखेर या भागातील ग्रामस्थानी विशाल सेवा फाउंडेशन चे सर्वेसर्वा आणी भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्याकडे धाव घेतली.ग्रामस्थांची ही गैरसोय पाहता भाजपच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विशाल सेवा फाउंडेशन अध्यक्ष विशाल परब यांनी स्वतः  पदरमोड करून आंजीवडे मार्ग पूर्णत्वास नेला आहे. आणी अखेर तब्बल आठ दिवसापेक्षा जास्त दिवस बंद असलेला आंजिवडा रस्ता अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. अखेर आंजीवडे गावातील सर्व ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे आणी विशाल सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप युवा नेते यांचे आभार  मानले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सभापती मोहन सावंत, भाई बेळणेकर, राजा धुरी, सखाराम शेडगे, कृष्णा पंदारे, वासुदेव सकपाळ, मधुकर सकपाळ, आंजिवडे पोलिस पाटील नारायण पंदारे व सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.