अनिल पाटील यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 06, 2024 10:26 AM
views 514  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले किशोर तावडे यांची बदली झाली असून, या ठिकाणी अनिल पाटील यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून स्वीकारला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले किशोर तावडे यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर तावडे यांची मॅनेजिंग डायरेक्टर फार्मिंग कॉर्पोरेशन पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर मुंबई येथील हापकिन बायोफार्माचे मॅनेजिंग डायरेक्टर असलेले अनिल पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.