
वैभववाडी : लोरे नं२गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी अनिल नराम यांची बिनविरोध निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.
गावचे विद्यमान अध्यक्ष सुरेंद्र रावराणे यांची मुदत संपल्याने ग्रामसभेत नव्याने तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडण्यात आला.गावच्या सभेत श्री.नराम यांचं नाव प्रमोद पांचाळ यांनी सुचविले त्याला रितेश मेस्त्री यांनी अनुमोदन दिले.उर्वरीत कोणीही इच्छुक नसल्याने श्री नराम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.श्री.नराम यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले आहे.तसेच गावच्या सामाजिक कामातही त्यांचा नेहमीचा पुढाकार असतो.त्यांच्या निवडीनंतर त्यांचं पंचायत समीतीचे माजी सदस्य मंगेश लोके, गावचे सरपंच विलास नावळे यांनी अभिनंदन केले.निवडीनंतर बोलताना श्री.नराम म्हणाले,गाव विना तंटा राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन.तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करेन असा विश्वास व्यक्त केला.