
मालवण : कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा. उद्या ही जत्रा होणार आहे. यानिमित्ताने कोकणवासीयांच्या उत्सुकता शिगेल्या पोचल्यात.
नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हणून आंगणेवाडीच्या भराडीदेवीची महती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जत्रोत्सवानिमित्त भाविक इथं हजेरी लावतात. नवस फेडतात, नव्याने करतातही. त्यामुळे दरवर्षी गर्दीचा नवा उच्चांक होत असतो.
अगदी मंत्रीमंडळही जत्रोत्सवानिमित्त इथे उपस्थित असतात. देवीला साकडे घालतात. शिवाय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार असल्याने नेतेमंडळीची हमखास उपस्थिती असणार आहे.
आंगणेवाडीच्या जत्रेसाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केलीय. दर्शनच्या रांगा, मोबाईल नेटवर्क, सुरक्षा अशा सगळ्याच पातळीवर प्रशासन सज्ज आहे. शिवाय ड्रोन द्वारे जत्रोत्सावावर लक्ष राहणार आहे.