अंगणवाडी सेविका माया सातार्डेकर यांचे निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 22, 2024 13:27 PM
views 421  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगांव ब्राम्हणपाट येथील अंगणवाडी सेविका माया प्रविण सातार्डेकर ( ४५, रा. मळगांव रेडकरवाडी ) यांचे शनिवारी रात्री ११ च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सदैव हसतमुख व सर्वांशी मनमिळाऊ स्वभावाच्या माया यांच्या निधनामुळे मळगांव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या , आई, तीन भाऊ, वहीनी ,बहिण असा परिवार आहे. मळगांव गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य कै. प्रविण सातार्डेकर यांची ती पत्नी तर माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर यांची वहिनी होत.