पाचशे मतांची लायकी नसलेल्या अंधारेनी नारायणराव राणेंवर बोलायला जाऊ नये. कार्यसम्राट राणे हे कोकणवासीयांसाठी दैवतासमान - नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर यांनी सुषमा अंधारेना फटकारले

मंत्री राणे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही.
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 29, 2022 15:41 PM
views 703  views

कुडाळ : नारायणराव राणे हे कोकणचे दैवत आहे. अविकसित कोकणला त्यांनीच विकासाची दिशा दाखवली आणि कोकणी माणसाला आत्मसन्मान शिकवला. अन्यायाविरोधात ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा जोमात असलेल्या शिवसेनेच्या अंगणात, मातोश्रीच्या दारात सभा घेऊनच ती सोडली. त्यावेळी तुमचे आताचे नेते उद्धव ठाकरे कुठे होते? हे त्यांना विचारून घ्या आणि मगच नारायण राणेंवर तोंडसुख घ्यायची हिंमत करा. आता जनतेला हिंदुत्व शिकवत फिरणाऱ्या अंधारे बाई मागच्या गेल्या अडीज वर्षाच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीच्या बुरख्याआडून हिंदू देवदेवतांबद्दल  सतत अश्लील टीका करत फिरत होत्या आणि उद्धव ठाकरे हात उशाला घेऊन घरात झोपले होते. तुम्ही दोघांनीही गेल्या अडीज वर्षात हिंदुत्व आणि राज्याचा विकास यांची अपरिमित हानी केलेली आहे. हा सेटबॅक भरून काढण्यासाठी राणे,शिंदे-फडणवीस हे सर्वच जण आता सातत्याने आणि जोरदारपणे काम करत आहेत. त्यांच्या मार्गात आडवे येत अपशकुन करण्यासाठी ठाकरे गटाने काही काळी मांजरे इकडेतिकडे सोडलेली आहेत. मांजरांसमोर माशांची चार डोकी फेकणे ही कोकणची संस्कृती आहे. पुढ्यात फेकलेली चार डोकी ही आपली लोकप्रियता असा याचा अर्थ कोण्या मांजरीने काढून शेपटी फुलवत फिरणे हास्यास्पद आहे. कोकणी भूतदयेतून इतकी माजोरी पण येऊ नये की मांजरीने थेट सिंहावर गुरगुरावे. कोकणच्या विकासासाठी अहोरात्र झटताना नारायण राणे आणि राणे परिवार तुमच्या फालतू गोष्टींवर वेळ वाया घालवू इच्छित नाहीत. पण त्यांच्या संयमाचा अर्थ कोणी दुबळेपणा असा करून घेऊ नये. सुषमा अंधारेनी वेळीच मातोश्रीचे तुणतुणे घेऊन राणेंवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे थांबवावे. कोकणच्या दैवतावर टीका करून आमच्या भावना दुखवू नये अन्यथा आमच्याकडूनही मर्यादा पाळल्या जाण्याची अपेक्षा करू नये.

   या सुषमा अंधारे बाईंचे वडील हे भाजपाचे कार्यकर्ते आणि तीस वर्षे गावचे सरपंच होते. आजही त्यांच्या घरात ती कमळे दिसतात. पण स्वार्थासाठी उड्या मारण्याची सुषमाबाईंची सवय असल्याने वडिलांच्या मागे गावाने त्यांना राजकारणातून बाहेर फेकले. परळी विधानसभेत त्यांना ४४९ मते (फक्त ०.०३ टक्के) मिळाली. इथे कोकणात ग्रामपंचायत सदस्यदेखील किमान पाचशे मते मिळवतात. विधानसभेसारख्या मोठ्या मतदारसंघातही पाचशे मते मिळवायची लायकी नसलेल्या या बाईने राणेंवर टीका करताना जनाची नव्हे तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती. या बाईला ठाकरे सेनेने इतरांवर अन्याय करत उपनेता बनवली ती फक्त राज्यभर फिरत वाचाळपणा करून भाजपा नेत्यांवर टीका करण्यासाठीच! राणेंवर टीका करण्यापूर्वी आपली पाचशे मतांची पण लायकी नाही हे पक्के ध्यानात ठेवून बोलत जावे. हिंदू देवदेवतांवर केलेल्या टिकेने भिड चेपली असेल, पण त्या पापाची शंभरी या कोकणच्या दैवतावर टीका केल्यास भरल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव ठेवून वाचाळपणाला वेळीच आवर घालावा असा इशारा कुडाळ नगरपंचायतीच्या भाजपा नगरसेविका सौ प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिला आहे.